यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ डिसेंबर २३ शुक्रवार
तालुक्यातील सावखेडासिम येथील रहिवाशी तसेच यावल पंचायत समितीचे माजी सदस्य व यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य त्याचबरोबर पक्षाचे एकनिष्ठ व सक्रीय कार्यकर्ते नागेश्र्वर कौत्तीक साळवे यांची भारतीय जनता पक्षाच्या अनुसुचित जाती मोर्चाच्या जळगाव पुर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीचनिवड करण्यात आली आहे.
नागेश्र्वर कौत्तीक साळवे यांची निवड भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हा पुर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी पत्राव्दारे ही निवड केली असुन नागेश्वर साळवे यांच्या निवडीचे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री ना.गिरीष महाजन,रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार रक्षाताई खडसे,जळगाव लोकसभा क्षेत्राचे जळगावचे उन्मेष पाटील,आमदार सुरेश भोळे(राजु मामा),चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण,भुसावळ आमदार संजय सावकारे,भाजपाचे यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,भाजपा सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राकेश फेगडे,जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील,किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष नारायण चौधरी,जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी,शरद महाजन,डॉ. कुंदन फेगडे,जिल्हा परिषदचे माजी शिक्षण समिती सभापती रविन्द्र पाटील,सुरेश पाटील,दहिगावचे उपसरपंच देवीदास पाटील यांच्यासह पक्षातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी स्वागत केले आहे.