यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ डिसेंबर २३ शुक्रवार
येथील युवा सामाजीक कार्यकर्त व माजी नगरसेवक डॉ.कुंदन सुधाकर फेगडे व मित्र परिवाराच्या वतीने आयोजीत आयुष्यमान भारत या मोफत कार्ड व नोंदणी शिबिरास गरजु नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.यावल येथील भुसावळ मार्गावरील असलेल्या आई हॉस्पिटलच्या शेजारी डॉ.कुंदन सुधाकर फेगडे मित्र परिवारातर्फे सामाजीक उपक्रम म्हणुन नागरिकांकरिता विविध उपचार व आरोग्याच्या हितासाठी देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या संकलपनेतुन देशातील नागरीकांना केंद्र शासनाच्या वतीने गरीब कुटुंब व शहरातील गरीब लोकांच्या कुटूंबांना आरोग्य विमा उपलब्ध होणार असुन देशातील १o कोटीहुन अधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळणार असून काल दि.२८ डिसेंबर गुरुवार रोजी मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात यावल शहरासह तालुक्यातील तब्बल ८०० गरजु नागरिकांनी आपली नोंदणी केली व त्यांना मोफत कार्ड वितरण करण्यात आले.
यावल शहरात भुसावळ रस्त्यावरील आई हॉस्पिटलच्या शेजारी डॉ.कुंदन सुधाकर फेगडे मित्र परिवाराकडून मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी व कार्ड वितरण शिबीर आयोजीत करण्यात आले.यात यावल शहर व तालुक्यातील मोठ्या संख्येत नागरिकांनी उपस्थिती देऊन सुमारे ८०० नागरिकांना या शिबिरात मोफत आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी करून कार्ड बनवून वितरण करण्यात आले.सदर शिबिरात भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,डॉ.कुंदन फेगडे,युवा शहराध्यक्ष रितेश बारी,परीष नाईक,सागर लोहार,मनोज बारी आदींनी उपस्थित राहून या आयुष्यमान नोंदणी शिबीरास परिश्रम घेवुन यशस्वी केले.