योगेश पाटील
रावेर-पोलीस नायक(प्रतिनिधी):- राज्यभरात लंम्पि आजाराने थैमान घातलेले असतांनाच तालुक्यातील निंभोरा सिम गावात लंम्पि रोगाचा शिरकाव झाला असल्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.यात निंभोरासिम गावातील विमलबाई संजय सवर्णे यांच्या मालकीची गाय आज दि.3 रोजी लंम्पि आजारामुळे मयत झालेली आहे.पशुपालक यांनी या गाईला वाचविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले त्याचबरोबर त्यांनी औषधोपचारहि केला इतके सर्व काही करून देखील त्यांना सदरील गाय वाचविण्यात यश आले नाही.यावेळी वैद्यकीय अधिकारी एन एस नेमाडे व पोलीस पाटील मगन सवर्णे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला.
लंम्पि आजाराच्या शिरकावामुळे गावातील पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.गावात लंम्पि आजारामुळे गुरांचा मृत्यू होण्याचे सत्र चालूच असल्याने पशुपालकांनी आपल्या गुरांना वागवायचे कसे?याची चिंता भेडसावीत आहे.याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवुन लंम्पि आजार निर्मुलनावर प्रभावी अमलबजावणी करण्यात यावी. तसेच ज्या पशुपालकांची गुरे लंम्पि आजारामुळे दगावली असतील त्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी पशुपालकांमधून केली जात आहे.