यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.५ जानेवारी २३ शुक्रवार
संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधणाऱ्या यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या दि.४ फेब्रुवारी २४ रोजी होणाऱ्या पंचवार्षीक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असुन उमेदवारी अर्ज विक्रीस सुरुवात झाली असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी नंदकिशोर मोरे यांनी दिली आहे.
यावल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी क्रांतीकारी निर्णय घेत सहकार क्षेत्रातील उंच भरारी घेतलेल्या यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादीत सहकारी संस्थेच्या पंचवार्षीक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.यात सोसायटीच्या निवडणुकीत व्यक्तीशः व वर्ग सभासद निवडुन द्यावयाची संख्या ५ असुन संस्था अ वर्ग सभासद जागेतुन ७ संचालक,अनुसुचित जाती/जमाती राखीव १ संचालक,महिला राखीव २ संचालक,इतर मागास प्रर्वग राखीव जागा १ संचालक,विमुक्त जाती/भटक्या जमाती/ विशेष प्रर्वगासाठी राखीव १ संचालक असे एकुण १७ संचालक निवडुन द्यावयाचे आहे.यावल येथे दि.२ जानेवारी २४ पासुन उमेदवारी अर्ज सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यावल या ठीकाणी अर्ज विक्री व स्विकारण्याच्या प्रक्रीयेस सुरुवात झाली असुन काल दि.४ जानेवारी पर्यत एकुण ६५ अर्जांची विक्री झाली यातील २३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख ही दि.६ जानेवारी २०२४ असुन दि.९ जानेवारी २४ रोजी उमेदवारी अर्ज छाननी व नामनिर्दशन यादी दि.१० जानेवारी २४ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल तसेच नामनिर्दशन अर्ज माघारी दि.१० जानेवारी ते २४ जानेवारी २४ अशी राहणार आहे तर दि.२५ जानेवारी २४ रोजी पात्र उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.दरम्यान दि.४ फेब्रुवारी २४ रोजी निवडणुकीचे मतदान होणार असुन या निवडणुकीत २८२५ सभासद आणी ४८ सहकारी सोसायटीचे असे एकुण २८७३ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतीलआणि दि.५ फेब्रुवारी २४ रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी नंदकिशोर मोरे यांनी दिली आहे.