Just another WordPress site

“बाबासाहेबांच्या विचारांचा पक्ष चालवायचा असेल तर सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणले पाहिजे”

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.५ जानेवारी २३ शुक्रवार

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला ४०४ हून अधिक जागा मिळतील असे त्यांनी सांगितले तसेच आम्ही सुरुवातीपासून बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून काम करून पक्ष वाढवत आहोत पण काही लोकांनी पक्षाचे नाव बदलून आपले राजकारण सुरू केले.बाबासाहेबांच्या विचारांचा पक्ष चालवायचा असेल तर सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणले पाहिजे असे आवाहन करत असताना त्यांनी प्रकाश आंबडेकारांना एक ऑफर दिली.रामदास आठवले म्हणाले की,लोकांनी जर ठरविले तर नेते एकत्र येऊ शकतात.प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आरपीआय पक्षाची धुरा स्वतःच्या हातात घ्यावी व ते जर महायुतीमध्ये येण्यासाठी तयार असतील तर मी त्यांच्यासाठी पक्षाचे अध्यक्षपद आणि केंद्रीय मंत्रीपद सोडण्यासाठी तयार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारके पूर्ण केली आहेत त्यामुळे ते संविधान बदलतील अशी अफवा पसरविण्याचे काही कारण नाही अशी अफवा पसरवून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न कुणी करू नये असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
तसेच ऐक्य करायचे असेल तर खालच्या पातळीवरही ऐक्य झाले पाहीजे.जनतेला माझे आवाहन आहे की,फक्त नेत्यांना दोष देऊन चालणार नाही.खालच्या पातळीवर आपण गावागावात एकत्र आहोत का? स्थानिक पातळीवर अनेक संघटना स्थापन केल्या जातात.एका नेत्याच्या पाठिमागे उभे राहण्याची मानसिकता लोकांमध्ये नाही.संघटना स्थापन करून लगेच राष्ट्रीय नेता होण्याची अहमहमिका समाजात दिसते अशी खंतही आठवले यांनी बोलून दाखविली.काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता भारत जोडो यात्रा काढत आहेत त्यावर भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले की,गेली ७० वर्ष काँग्रेसने भारत फोडला होता का? आताच भारत जोडो करण्याची परिस्थिती का आली? तुम्ही कितीही यात्रा काढत राहा पण काँग्रेसला यश मिळेल अशी परिस्थिती अजिबात नाही त्यांनी प्रयत्न करत राहावेत पण जनता पुन्हा भाजपालाच निवडून देईल असा आमचा विश्वास असल्याचेही आठवले म्हणाले.२०२४ च्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकांना सामोरे जाणार आहे. यावर्षी ४०४ च्या पुढे जागा मिळतील.इंडिया आघाडीने कितीही प्रयत्न केला तरी त्यांना यश मिळणार नाही.‘अब की बार,पुन्हा मोदी सरकार’, असा नारा लोक देत आहेत.सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे.रिपब्लिकन पक्ष देश पातळीवर एनडीएसह आहे. माझ्या पक्षाला राज्यात दोन तरी जागा देण्यात याव्यात.दलित मतांना आकर्षित करण्यासाठी आरपीआयला ताकद देण्याची गरज आहे.राज्य मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला न्याय देऊ असे सांगण्यात आले होते मात्र अजित पवार येताच आमचा विसर पडला.मुंबई,सोलापूर अथवा विदर्भात आरपीआयला जागा देण्यात यावी यासाठी प्रयत्न करण्यात असल्याचेही आठवले यावेळी म्हणाले.
Leave A Reply

Your email address will not be published.