यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.६ जानेवारी २३ शनिवार
प्रत्येक जण आपल्या शालेय जीवनात शैक्षणिक अभ्यासाची कास धरत प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना अधिक जास्त परिश्रम करावे लागत असतात.परिणामी आपल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मुबलक वेळ त्यांना मिळत नसतो व यासाठी आपण आपल्या शालेय जीवनामध्ये आपल्या सुप्त गुणांना वाव देऊन ते दाखवण्याची नामी संधी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ही प्रत्येक विद्यार्थ्याला चालून येत असते.प्रसंगी ती आपण धरून आपल्या या सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे असे प्रतिपादन श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विनायक तेली यांनी चुंचाळे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रम प्रसंगी केले आहे.
तालुक्यातील चुंचाळे येथील श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे नुकताच सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संस्थेचे सचिव जगन्नाथ कोळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य विनायक तेली,उपशिक्षक डी.बी.मोरे, वाय.वाय.पाटील,एस.एस.पाटील,एम.पी.पाटील,एम.आर.चौधरी,एस.बी.गोसावी,एस.एन.चौधरी,पी.एस.सोनवणे,प्रा.आर.जे.अडकमोल तसेच पालक उपस्थित होते.सदर कार्यक्रमांमध्ये सावित्रीबाई फुले,राजमाता जिजामाता,रमाबाई रानडे,रमाबाई आंबेडकर,अहिल्यादेवी होळकर तसेच अन्य सामाजिक महिलांवरती देखील मनोगत व्यक्त करण्यात आले.सांस्कृतिक कार्यक्रमात सामाजिक जनजागृतीपर गाण्यांवरती विद्यार्थिनींनी सुंदर असे नृत्य केले.सदर सांस्कृतिक कार्यक्रम हा विद्यालयातील उपशिक्षिका निलंगी पाटील,प्रा.शारदा चौधरी,प्रा.जमीला तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारावीची विद्यार्थिनी वैभवी कोळी तर आभार नंदिनी कोळी हिने केले.सदर सर्व स्पर्धक विद्यार्थिनींना प्राचार्य विनायक तेली,उपशिक्षक प्रशांत सोनवणे व आर.जे.अडकमोल यांच्या वतीने बक्षीस जाहीर करण्यात आली.