यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.८ जानेवारी २४ सोमवार
तालुका मुख्याध्यापक संघाच्या तालुका अध्यक्षपदी सलग सातव्यांदा जयंत चौधरी व चिटणीसपदी सुनिता पाचपांडे यांची नुकतीच निवड करण्यात आली.
येथील सरस्वती विद्यालयात तालुका मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारणी निवडीच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा निवडणूक निरीक्षक जे.पी.सपकाळे हे होते.यावेळी जे.पी.सपकाळे यांनी निवडणुकीचे नियम व अटी याविषयी मार्गदर्शन केले व त्यानंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली.त्यानुसार मुख्याध्यापक संघाच्या तालुका अध्यक्षपदी सलग सातव्यांदा माध्यमिक विद्यालय वड्रीचे मुख्याध्यापक जयंत रमेश चौधरी व चिटणीसपदासाठी शारदा माध्यमिक विद्यालय न्हावीच्या मुख्याध्यापिका सुनिता प्रभाकर पाचपांडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.परंतु कार्यकारणीच्या इतर पदांच्या निवडीसाठी पात्र शाळांच्या मुख्याध्यापकांचे अर्ज नसल्याने इतर पदांची निवड करण्यात आली नाही.यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,जिल्हा पतपेढीचे संचालक सिद्धेश्वर वाघुळदे,मुख्याध्यापक जी.डी.कुलकर्णी,एस.बी.बोठे,अशपाक शेख,डी.व्ही.चौधरी,उमाकांत महाजन,जी.एन.खान,चारुशीला नेहते,समाधान भोई,नितीन झांबरे,जयंत नेवे,गिरीश पाटील,हनीफ सैयद,समर बेग,इम्रान शेख,योगेश कोळी,के.जी.चौधरी,प्रवीण तळेले, जितेंद्र चौधरी,महेंद्र पाटील,दीपक चौधरी,किरण ओतारी आदी उपस्थित होते.