यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० जानेवारी २३ बुधवार
यावल-भुसावळ मार्गावरील अंजाळे गावाजवळील घाटावर मोर नदी वरील पुलावर नव्याने लाखो रूपये खर्चाने बांधण्यात आलेल्या पुल आणी रस्ता हा वाहनांसाठी अत्यंत धोकादायक व भिषण अपघाताला आमंत्रण देणारे असुन या रस्त्यावर वाहनांना नियंणत्रीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने या ठिकाणी त्वरित गतीरोधक बसवावे अशी मागणी वाहनधारक व नागरीक वर्गाकडून करण्यात आली आहे.
यावल-भुसावळ हा जवळपास १८ किलोमिटरचा प्रवाशी मार्ग असुन सदरच्या मार्गावरील रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते.या मार्गाची गेल्या अनेक दिवसांपासुन राजोरा फाटा ते अंजाळे गावापर्यंत रस्त्यावर मोठमोठी खड्डे निर्माण होवुन रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे.दरम्यान अंजाळे गावाजवळच्या अंजाळे घाटावरील मोर नदीच्या पुलावर मागील दोन वर्षापुर्वी नवीन पुलाची बांधणी करीत नव्याने पुलासह वळणाचा रस्ता तयार करण्यात आला असुन नव्याने तयार झालेल्या या रस्त्यावर धोकादायक वळणासह मोठा उतार असल्याने या ठीकाणी भुसावळ कडुन येणारी वाहन हे अतिवेगाने येतात व या वेगाने येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनामुळे या ठीकाणी कोणत्याही क्षणी मोठे अपघात होवुन मोठी जिवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.परिणामी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या रस्त्यावर तात्काळ वाहनांचे वेग नियंणत्रीत करण्यासाठी व संभाव्य अपघात टाळण्यासाठी किमान चार ठिकाणी गतीरोधक बसविण्यात यावे अशी मागणी वाहनधारकांसह नागरीकांच्या वतीने करण्यात आली आहे.