मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):–देशभरात सगळीकडे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.त्यामुळे ठिकठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात येत आहे.यामध्ये लोक पूर्णपणे बेधुंद होऊन गरबा खेळत नाचत असतात.मात्र या गरबा खेळण्याच्या दरम्यान विरारमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.यामध्ये गरबा खेळताना मनीष जैन या मुलाचा मृत्यू झाला.हि बातमी ऐकताच त्याचे वडील नरपत जैन यांना याबाबत मोठाच धक्का बसला आणि त्यांना हृदरविकाराचा झटका आला व त्यांनीदेखील आपले प्राण सोडले.या घटनेमुळे सर्व परिसर दुःखाच्या सागरात दुबळा गेला.यावेळी अनेकांच्या मनाचा बांध फुटला.लहानथोर मंडळींमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली.सर्व परिसर अक्षरशः धाय भोकलून रडत होता.
विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथे राहणारा मनीष नरपत जैन हा रात्रीच्या सुमारास बिल्डिंगच्या आवरात गरबा खेळत होता.यावेळी त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला.यानंतर त्याच्या वडिलांनी आणि तिथे असलेल्या नागरिकांनी त्याला विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल केले मात्र त्यागोदरच त्याचा मृत्यू झाला होता.यानंतर आपला मुलगा गेल्याचे समजताच वडील नरपत जैन यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि ते जागीच कोसळले.यात त्यांचाही जागीच मृत्यू झाला.या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.एका क्षणात वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.या घटनेमुळे जैन कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.