यावल-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० जानेवारी २४ बुधवार
महाराष्ट्रातील अखिल पोलीस पाटील यांना ग्रामपंचायत कार्यालयात जागा उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीचे निवेदन आज दि.१० जानेवारी रोजी फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांना देण्यात आले.
सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,पोलीस पाटील हे महसूल व पोलीस प्रशासनाचे गाव पातळीवरील महत्त्वाचा घटक असून संबंधित विभागांकडून वेळोवेळी येणाऱ्या आदेशांची पोलीस पाटील यांना अंमलबजावणी करावी लागते.सदरहू पोलीस पाटील यांना ग्रामपंचायत कार्यालयात जागा उपलब्ध करणेबाबत दि.१७ डिसेंबर २०१२ चा शासन निर्णय असून सुद्धा मात्र अजून याची दखल घेतली गेलेली नाही हि मोठी दुर्दैवाची बाब आहे.तरी याबाबत वरिष्ठ पातळीवर पोलीस प्रशासनामार्फत व शासन स्तरावरून पाठपुरावा करण्यात यावा याबाबत आज दि.१० जानेवारी बुधवार रोजी फैजपुर पोलीस पाटील ग्रुपतर्फे फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांना सदर मागणीचे निवेदन देण्यात आले.यावेळी फैजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.