यावल येथे आमदार अपात्र प्रकरणी नार्वेकर यांच्या पक्षपाती निर्णयाच्या निषेधार्थ ठाकरे सेनाच्या वतीने फलकाला जोडे मारो आंदोलन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ जानेवारी २४ शनिवार
महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागुन असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या १६ आमदार अपात्रता निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या बाजुने अनपेक्षीत निकाल दिल्याने उध्दव बाळासाहेब ठाकरे सेने यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावल शहरातील भुसावळ टी पाँईट या चौकात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात पक्षपाती निर्णय दिल्याने त्यांच्या प्रतिकात्मक फलकावर जोडे मारत त्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करीत फलक जाळून संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या.
याप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा उपप्रमुख गोपाळ चौधरी,तालुका उपप्रमुख शरद कोळी,यावल शहरप्रमुख जगदीश कवडीवाले,शहर उपप्रमुख संतोष धोबी,आदिवासी सेनेचे हुसैन तडवी,ईस्माईल तडवी,विनोद पाटील,एल.व्ही.पाटील,शिवाजी पाटील,शुभम गोतमारे,योगेश चौधरी,सुनिल बारी,योगेश पाटील,आर.के.चौधरी,डॉ.विवेक अडकमोल,प्रल्हाद बारी,पिंटु कुंभार,शिवाजी पाटील,हेमंत पाटील, सागर देवांग,सचिन कोळी,भाऊसाहेब धनगर,संतोष वाघ,नारायण फेगडे यांच्यासह सेनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.