Just another WordPress site

यावल महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१३ जानेवारी २४ शनिवार

येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व अध्यात्मिक गुरू युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.

प्र.प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सेवा योजना तसेच विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालया चे उपप्राचार्य प्रा. ए पी पाटील हे होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली.अध्यक्षीय भाषणात प्रा.ए.पी.पाटील यांनी कणखरपणा,सामाजिक जबाबदारी,संभाषण कौशल्य,अनुभवातून शिकवण,बचत करणे या गुणांचा विद्यार्थ्यांनी अधिकार करावा असे सांगितले.प्रा.निर्मला पवार यांनी स्वामी विवेकानंदांचा जीवनपट सविस्तरपणे मांडला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.एस.पी.कापडे,डॉ.हेमंत भंगाळे,डॉ.पी.व्ही.पावरा,प्रा.रजनी इंगळे,प्रा.कोष्टी मॅडम,प्रा.सी.के.पाटील,प्रा.अरुण सोनवणे, मिलिंद बोरघडे,संतोष ठाकूर,प्रमोद भोईटे,प्रमोद कदम यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रावते यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.मनोज पाटील यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.