यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ जानेवारी २४ मंगळवार
तालुक्यातील एका गावात एकाच समाजातील तरूण व तरुणी हे एकामेकाच्या सहमतीने लग्न न करता एकामेकांना जाणुन घेण्यासाठी हा योग्य पर्याय असुन याच आधारावर न्यायालयाच्या परवानगीने लिव्ह ईन रिलेशनशिफमध्ये राहात असल्याकारणाने तरूणीच्या कुंटुबाकडून तरूणाच्या कुटुंबास मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.सदरहू लिव्ह ईनमध्ये राहणाऱ्या तरूणाच्या कुटुंबास मारहाण झाल्याची तालुक्यातील ही दुसरी घटना असुन याबाबत मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
यावल तालुक्यातील एका गावात मागील चार महीन्यांपासुन लिव्ह ईन रिलेशनशिप मध्ये राहणारे एकाच जातीच्या जोडप्यांच्या कुटुंबाला तरुणीच्या संतप्त झालेल्या कुटुंबीयांकडून काल दि.१५ जानेवारी रोजी दुपारी १.३० च्या सुमारास तिन जणांनी तरूणाच्या घरात घुसुन कुटुंबांतील दोन जणांना मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली व घरातील सुमारे पन्नास हजार रूपये किमतीच्या मौल्यवान वस्तुची तोडफोड करीत तरुणांच्या कुटुंबातील काही सदस्यांना मारहाण केल्याची घटनासमोर आली आहे.याबाबत तरुणाच्या कुटुंबीयांनी यावल पोलीस ठाण्यात गावातील पोलीस पाटील यांच्या मदतीने जळगाव येथील राहणाऱ्या तरुणीच्या कुटुंबाविरूद्ध तक्रार दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.