यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ जानेवारी २४ शुक्रवार
तालुका काँग्रेस कमेटी व परिसरातील शेतकरी बांधव यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी बाधवांना केळी पिक विम्याची रक्कम तात्काळ मिळावी व कापसाला भाव नाही आणि शासनाकडून अद्याप पावेतो खरेदी करण्यात येत नसल्याने शेतकरी बांधव यांना विविध संकटांना व आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने शासनाने याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा यासाठी कॉंग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली यावल तहसीलदारांच्या वतीने निवासी नायब तहसीलदार संतोष विंनते यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
सदरील निवेदनात म्हटले आहे की,जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हवामानावर आधारतीत फळ पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २२-२३ या वर्षातील आंबीया बहार केळी उत्पादक शेतकऱ्यांना अजुनही भरपाईची पुर्ण रक्कम मिळालेली नाही.पिक विमा कंपनीने अद्यापपावेतो जवळपास ३६ हजार शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना मंजुरी दिलेली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.मागील वर्षी जळगाव जिल्ह्यातील ८३ हजार हेक्टर क्षेत्रावर ७७ हजारहुन अधिक शेतकऱ्यांनी केळी पिक विमा काढलेला होता.त्यानंतर पिक विमा कंपनीने विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येवर आक्षेप घेत पिकांची पडताळणी करण्यात आली होती मात्र त्या वेळेस पडताळणी पुर्ण करण्यात आली नाही.पिक हंगाम संपल्यावर व विमा संरक्षण कालावधी संपल्यावर पुन्हा पडताळणीचा करण्याचा आग्रह धरला यामुळे १५ सप्टेंबर शेतकरी बांधवांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळाल्या हवी होती ती रक्कम आजपर्यंत संपुर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही.पीक विमा कंपनीने सुमारे ५४ हजार शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी पात्र ठराविले आहे तरी देखील यातील काही ठरावीकच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली असून उर्वरीत शेतकऱ्यांना अद्यापपावेतो विम्याची रक्कम मिळालेली नाही.याशिवाय सुमारे ३६ हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा कंपनी कडून मंजुरी देण्यात आलेली नसल्याचे निवेदनात म्हटले असुन या गोंधळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेले केळी उत्पादक शेतकरी गाव गावात रस्त्यावर उतरून लोकप्रतिनिधिंना गावबंदी करण्याच्या तयारीत लागले असुन या केळी उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानीसाठी पीक विम्याची रक्कम मिळावी व तसेच शासनाने तात्काळ योग्य भावाने शेतकऱ्यांचा कापुस खरेदी करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.सदर निवेदनावर अमोल भिरूड,राजु तडवी,ज्ञानेश्वर बऱ्हाटे,सुलेमान तडवी,डिगंबर पाटील,कदीर खान,पद्दमाकर पाटील,सतिष पाटील,हाजी गफ्फार शाह,समाधान पाटील,मुक्तार पटेल,संदीप सोनवणे,विशाल फेगडे,धिरज कुरकुरे,अल्ताफ तडवी,भगवान महाजन,सुभाबाई पाटील,मुरलीधर महाजन,विशाल फेगडे,अनिल महाजन व शेतकरी बांधवांच्या स्वाक्षरी आहेत.