श्रीराम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळा शोभायात्रा सर्वधर्मीयांनी एकत्र येवुन शांततेत साजरी करण्याचे पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ जानेवारी २४ रविवार
उद्या दि.२२ जानेवारी रोजी संपुर्ण देशासह यावल शहरात व परिसरात साजरा होणारा श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्व जातीधर्माच्या लोकांनी कुठल्याही प्रकारच्या सोशल मिडीयावर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता एकत्र येवुन सदरील सोहळा शांततेत साजरा करावा असे आवाहन पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांनी यावल येथे संपन्न झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत आवाहन केले आहे.
यावल पोलीस ठाण्याच्या आवारात दि.२२ जानेवारी २४ सोमवार रोजी श्रीराम मंदीर प्राणप्रतिष्ठाच्या निमित्ताने शहरात काढण्यात येणाऱ्या शोभायात्राच्या पार्श्वभुमीवर संपन्न झालेल्या शांतता समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली.सदरील बैठकीत शांतता समिती सदस्य हाजी शब्बीर खान यांनी शहराची एकता,अखंडता व बंधुभाव कायम राखुन शोभायात्रा संपन्न करावी तसेच त्यांनी लहान अल्पवयीन मुलांमध्ये ज्या पद्धतीने जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाज विघ्नसंतोषी मंडळीकडुन करण्यात येत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे यासाठी आपण सर्वांनी एकत्र येवुन प्रयत्न करणे गरजे असल्याचे आवाहन शांतता समिती सदस्य हाजी शब्बीर खान यांच्यासह पुंडलीक बारी,दिपक बेहेडे यांनी केले तर शहरातुन शोभायात्रा मार्गाबाबतही चर्चा करण्यात आली.सदर बैठकीला शांतता समितीचे जेष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान,गोपाळसिंग पाटील,विजय सराफ,माजी नगरसेवक गुलाम रसुल,भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले,यावल शहराध्यक्ष निलेश गडे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चेतन अढळकर,हाजी गप्फार शाह,हाजी ईकबाल खान,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सैय्यद युनुस सैय्यद युसुफ,प्रमोद नेमाडे,माजी नगरसेवक असलम शेख नबी,दिपक बेहेडे,पुंडलीक बारी,मोहसीन खान, सेवानिवृत्त प्रार्चाय शायर रहीम रजा,हबीब मंजर,शिवसेना (उबाठा )चे पप्पु जोशी यांच्यासह इतर शांतता समिती सदस्य उपस्थित होते.