यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ जानेवारी २४ शुक्रवार
येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भूगोल सप्ताह निमित्त भौगोलिक साहित्य प्रदर्शन नुकतेच भरविण्यात आले.सदर प्रदर्शनास महाविद्यालयातील विद्यार्थांनी व विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवित प्रदर्शनाचा लाभ घेतला.
येथील महाविद्यालयात प्र.प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपप्राचार्य प्रा.ए.पी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भूगोल विभागामार्फत भौगोलिक साहित्य प्रदर्शनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले.यात प्लेन टेबल सर्वे व साहित्य,चैन टेबल सर्वे,प्रादेशिक नकाशे, भौगोलिक नकाशे,स्थलदर्शक नकाशे,जीपीएस मॅपिंग,रिमोट सेन्सिंग,GIS तसेच इतर साहित्याविषयी विद्यार्थ्यांना प्रा.नरेंद्र पाटील व प्रा.अर्जुन गाढे यांनी सविस्तर माहिती दिली.प्रदर्शन यशस्वीतेसाठी प्रा.नंदकिशोर बोदडे,प्रा.अक्षय सपकाळे,प्रा.संतोष जाधव,प्रा.पी.व्ही.मोरे यांच्यासह विद्यार्थी सचिन बारी,पिनू पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.