Just another WordPress site

यावल येथे शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत ज्वारी या भरड धान्य खरेदीस सुरूवात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२८ जानेवारी २४ रविवार

केन्द्र व महाराष्ट्र शासनाच्यावतीने आधारभुत किमतीच्या शासकीय ज्वारी भरड धान्य खरेदीची नुकतीच सुरूवात करण्यात आली असुन विविध मान्यवर व शेतकरी बांधवाच्या उपस्थितीत यावल केंद्राचे उद्घाटन शासकीय गोदाम व्यवस्थापक वाय.डी.पाटील यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले आहे.

दरम्यान ८३ शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली असुन महीना अखेरपर्यंत नोंदणी सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य गोदाम परिसरात आयोजीत या कार्यक्रम प्रसंगी प्रथम धान्य विक्रीस आलेले शेतकरी लिलाधर सुधाकर झांबरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.प्रसंगी शेतकरी बांधव यांच्या हस्ते तोल काट्याचे पुजन करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष सुधाकर नेहेते,संचालक यशवंत फेगडे,पंकज नेहेते,ललित महाजन,दत्तात्रय महाजन,वंसत महाजन,इमरान पटेल,महेंद्र नेहेते,कोरपावली संस्थेचे सचिव मुकुंदा तायडे व कर्मचारी नेमिचंद महाजन,योगेश साळुंके,चेतन चौधरी,रमजान तडवी व धान्य उत्पादक शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.