Just another WordPress site

किनगाव इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-

दि.२९ जानेवारी २४ सोमवार

तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल येथे १४ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.या स्नेहसंमेलनाचे आर्कषण ठरले ते आयोध्या येथे झालेल्या भगवान श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भगवान श्री राम,माता,सीता,राजा दशरथ,लक्ष्मण,भरत,शत्रुघ्न,माता शबरी इ.सह रामायणातील विविध पात्र विद्यार्थ्यांनी वेशभूषा परिधान करून सजवली परिणामी यावेळी जणू काही रामायणच सुरू आहे असे प्रेक्षकांना वाटत होते हे विशेष !

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंत पाटील,उपाध्यक्षा शैलेजाताई विजय पाटील,नेल्सन इंडिया प्रा.लि.कंपणीचे सिनीयर व्यवस्थापक आकाश वाघमारे,बालाजी डेव्हलपर्सचे संचालक मनिष विजयकुमार पाटील,प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील,उपप्राचार्य राजश्री सुभाष अहिरराव,पुनम मनिष पाटील,पो.पा.संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक रघुनाथ पाटील हे उपस्थित होते.या कार्यक्रमात सीता स्वयंवर,माता शबरी,श्रावण बाळ व रामायणकार महर्षी वाल्मिक ऋषी यांचा सजीव देखावा यावेळी विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांसमोर सादर केला तर महर्षी वाल्मिक ऋषी,रामसेतू,द्रोणागिरी पर्वत,हनुमान प्रतिमा,अयोध्येतील श्री राम मंदिर प्रतिकृती,श्री राम धनुष्य इ.चे जिवंत देखावे विद्यार्थी व शिक्षकांनी स्वतः तयार करून वार्षिक स्नेहसंमेलनाची शोभा वाढविली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक हर्षल मोरे,योगीता बिहारी,देवयानी साळुंखे,मिलींद भालेराव,भावना चोपडे,प्रतिभा धनगर,गोपाल चित्ते,पवनकुमार महाजन,सुहास भालेराव,सोनाली कासार,प्रतिभा पाटील,बळीराम कोतवाय,शेखर पाटील,वैशाली चौधरी,योगीता सावडे,रोहित बावीस्कर,दिलीप संगेले,मयुरी बारी,सोनाली वाणी,रत्ना बाविस्कर,वैशाली बडगुजर,अतुल साळुंखे,वैशाली मराठे,बाळासाहेब पाटील यांच्यासह वाहनचालक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.