यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ जानेवारी २४ सोमवार
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुका येथे पक्षकाराकडुन झालेल्या वकील अॅड राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी अॅड सौ मनिषा आढाव या दाम्पत्यांची निघृण हत्या करण्यात आल्याच्या निषेर्धात यावल येथे तालुका वकील संघाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आले तसेच वकील संघाचे तालुका अध्यक्ष अॅड सिद्धार्थ लोंढे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात वकीलांच्या शिष्ठ मंडळाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देवुन सदरचा गुन्हा फास्टट्रेक कोर्टात दाखल करून अॅड उज्वल निकम यांच्याकडून खटला चालावीण्यात यावा अशा मागणीचे निवेदन नुकतेच देण्यात आले.
सदरहू अशा प्रकारे जर वकीलांवर प्राणघातक हल्ले तर वकील बांधवांना योग्य प्रकारे न्यायलयीन काम करणे हे शक्य होणार नाही त्यांना नेहमीच भितीच्या वातावरणात काम करावे लागणार आहे.दि.२५ जानेवारी रोजी वकिल दाम्पत्यांचा खुन करणाऱ्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना कडक शासन व्हावे तसेच अॅडव्हकेट प्रोटेक्शन बिलास तात्काळ मंजुरी देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आज दि.२९ जानेवारी रोजी यावल येथे निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांना निवेदन देण्यात आले.यावेळी यावल तालुका वकिल संघाचे तालुका अध्यक्ष अॅड सिद्धार्थ आर लोंढे,सचिव अॅड याकुब ए तडवी,अॅड शामकांत कवडीवाले ,अॅड नितिन चौधरी,अॅड विनोद परतणे,अॅड खालीद शेख , अॅड किशोर सोनवणे ,अॅड धिरज चौधरी,अॅड आकाश चौधरी ,अॅड निवृती पाटील,अॅड यशवंत दाणी,अॅड शेखर तडवी,अॅड सुलताना तडवी,अॅड स्मिता कवडीवाले,अॅड डिपंल सुरळकर,अॅड स्वाती पाटील,अॅड टितेश बारी,अॅड भुषण महाजन यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.