यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१ फेब्रुवारी २४ गुरुवार
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कला मंडळ,इंग्रजी विभाग व हिंदी विभाग अंतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन नुकतेच मोठ्या उत्साहात करण्यात आले.नवीन शैक्षणिक धोरणाचे महत्त्व या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत प्रथम क्रमांक नयना संजय बारी,द्वितीय क्रमांक तेजस्विनी सुनील कोलते व तृतीय क्रमांक जयश्री संजय सोळंके या विद्यार्थिनी यश प्राप्त केले या स्पर्धेचे परीक्षक डॉ.एस.पी.कापडे,डॉ.पी.व्ही.पावरा व प्रा.रजनी इंगळे यांनी केले सदर स्पर्धेत १८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
तर बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर पोस्टर स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.या पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक बारेला रेशमी विक्रम,द्वितीय क्रमांक जयश्री संजय सोळंके,तृतीय क्रमांक रश्मी ताशा बारेला या विद्यार्थिनी यश प्राप्त केले.या स्पर्धेचे परीक्षक डॉ.संतोष जाधव,डॉ.निर्मला पवार यांनी काम बघितले सदर स्पर्धेत ७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.तसेच मतदान जागृती अभियान या विषयावर घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वाती संजय बाविस्कर,द्वितीय क्रमांक जागृती प्रल्हाद ढागे,तृतीय क्रमांक नयना संजय बारी या विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ.पी.व्ही.पावरा व प्रा.प्रतिभा रावते यांनी काम बघितले सदर स्पर्धेत ५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.