Just another WordPress site

अंजाळे मोर नदी पुलावर झालेल्या वाहनांच्या भिषण अपघात दोन जणांसह एक बालक जखमी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२ फेब्रुवारी २४ शुक्रवार

यावल-भुसावळ मार्गावरील अंजाळे जवळ असलेल्या मोर नदी पुलावर काल दि.१ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास पुनश्च चारचाकी वाहन व दुचाकी वाहनांचा तिहेरी भीषण अपघात होवुन यात भुसावळ कडून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने दोन दुचाकी वाहनास जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका दुचाकी मोटरसायकलवर मागे बसलेला १३ वर्षाचा मुलगा हा नदीच्या ५० फुट उंचीच्या पुलावरून नदीपात्रात जावुन कोसळल्याने व दोन मोटरसायकल चालक असे तीन जण या अपघातात गंभीर जखमी झाल्याचे वृत्त मिळाले आहे.या भिषण अपघातातील जखमींना भुसावळ येथे एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असुन अपघातानंतर कार चालक हा घटनास्थळावरून पळुन गेल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,यावल-भुसावळ मार्गावरील अंजाळे जवळ असलेल्या मोर नदी पुलावर काल दि.१ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास अज्ञात चालक कार क्रमांक एम.एच.१९ बी.यु.३०८५ घेऊन येत होता तर यावलकडून भुसावळकडे दुचाकी दुध विक्री करीता अरविंद प्रभाकर पाटील वय ४५ रा.बोरावल हे मोटरसायकलने जात असतांना त्यांच्या मागे अंजाळे येथुन भुसावळकडे पिंटू शेकोकार व त्यांचा मुलगा सोहम शेकोकार वय १३ दोघे राहणार अंजाळे तालुका यावल हे भुसावळ येथे दुध विक्रीस जात असतांना या दोन्ही दुचाकींना मोर नदी पुलावरून भुसावळकडून भरधाव वेगात येणारे एमएच १९ बि.यु ३०८५ या क्रमांकाच्या कारने धडक दिली.सदरहू चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत एम एच १९ बि के ३२६ या दुचाकीवर मागे बसलेला सोहम शेकोकार हा पुलावरून नदीपात्रात कोसळला व इतर दोन्ही दुचाकी चालकांसह बालक तिघे जण गंभीर जखमी झाले.या जखमींना तात्काळ घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने भुसावळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर अपघातानंतर कार चालक हा पसार झाला आहे.याबाबत यावल पोलिसांना माहिती या अपघाताची मिळाली असुन अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याचे पोलिसांनी सांगीतले.मागील महीन्यात याच मोर नदीच्या पुलावर चारचाकी व मोटरसायकलचा भिषण अपघात होवुन देऊळगाव गुजरीचा तरूण मृत्युमुखी पडला होता.दरम्यान या पुलावर वेग नियंत्रीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ गतीरोधक बसवावे अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.