मीनाक्षी पांडव
पोलीस नायक(मुंबई विभाग प्रमुख)
कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर (अंबाबाईचे देऊळ) हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी व महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन पीठांपैकी एक आहे.महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबाबतचे संशोधन परिपूर्ण नाही.हे देवालय शिलाहारापूर्वी करहारक (कर्हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे असे काही संशोधक म्हणतात.कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सिम भक्त होते.आपणास देवीचा वरप्रसाद मिळाल्याचे त्यांनी अनेक लेखांत लिहून ठेवले आहे.सातव्या शतकात चालुक्य राजवटीत राजा कर्णदेव याने हे देवालय बांधल्याचा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो.श्री महालक्ष्मीची मूर्ती दगडी चौथर्यावर उभी करण्यात आलेली आहे.मंदिरात घाटी दरवाजा,गरूड मंडप अशी सुंदर नक्षीकाम केलेली ठिकाणे आहेत.गरूड मंडप,सभा मंडप १८४४ ते १८६७ च्या दरम्यान बांधण्यात आला.अश्र्विन नवरात्रात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथर्यावर ठेवून तिची पूजा करतात.