Just another WordPress site

यावल चुंचाळे बस बंदमुळे प्रवाशी व विद्यार्थ्यांचे हाल

बस पुनश्च सुरू करण्याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांचे आगार प्रमुखांना निवेदन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.५ फेब्रुवारी २४ सोमवार

येथील एसटी बस आगारातुन नियमित सुटणाऱ्या चुंचाळे गावासाठीच्या बसगाडया पुर्वरत सुरू करण्यात याव्या अशी मागणी चुंचाळे गावातील सामाजिक कार्यकर्त सुपडू संदानशिव यांनी यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांना दिलेल्या एका निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की,यावल आगारातुन नियमित सुटणारी सकाळची ७:१५ वा.ची गाडी,बस,(यावल चुंचाळे मार्गे नायगांव जळगांव), तसेच दुपारी १:३० वाजता येणारी बस (यावल चुंचाळे मार्गे नायगांव) आणि संध्याकाळची ८ वाजेची बस (जळगांव यावल मार्गे नायगांव चुंचाळे) या बससेवा सुरू या मार्गावरील रस्ता अत्यंत खराब व नादुस्त असल्याकारणाने बंद करण्यात आल्या होत्या या बसगाडया पुर्वरत करण्यासाठी बोराळे येथील सामाजिक कार्यकर्ते सुपडु संदानशिव यांच्या वतीने यावल आगार प्रमुख दिलीप महाजन यांना नुकतेच निवेदन दिले आहे.येत्या दोन ते तीन दिवसांत बसेस सुरू न झाल्यास चुंचाळे फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल अशी माहिती निवेदनाद्वारे दिली आहे.सदरहू चुंचाळे येथे जाणाऱ्या बसगाडया मागील काही महिन्यांपासून चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावापर्यंतचा रस्ता नादुरुस्तीचे कारण दाखवून बंद करण्यात आले आहेत यामुळे शालेय शिक्षण घेणारे मुले-मुली तसेच चुंचाळे व बोराळे नायगाव गावातील नागरिक यांचे नाहक हाल होत असून दैनंदिन जीवनात होणाऱ्या कामाला अडथळा निर्माण होत आहे.विद्यार्थी मुला मुलींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरी निवेदनात दिलेल्या तिन्ही बबेस लवकरात लवकर सुरू करण्यात याव्या अन्यथा दोन ते तिन दिवसानंतर चुंचाळे फाट्यावर अंकलेश्र्वर बऱ्हाणपूर रत्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी व सदर आंदोलनास वेगळे वळण लागल्यास होणाऱ्या नुकसानास सर्वतोपरी आपण जबाबदार राहाल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तरी वरील नमूद केलेल्या तीनही बसेस लवकरात लवकर सुरू करण्यात याव्या अशी मागणी निवेदनाद्वारे तसेच चुंचाळे ग्रामपंचायत आणि बोराळे ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदनावर पत्रकार प्रकाश चौधरी,विकी वानखेडे व सुपडू संदानशिव व किरण तायडे यांच्या स्वाक्षरी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.