Just another WordPress site

यावल तालुका खरेदी-विक्री संघ निवडणूकीत महायुतीच्या सहकार पॅनलचा १६ जागा पटकावत दणदणीत विजय

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.६ फेब्रुवारी २४ मंगळवार

येथील तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या १७ संचालक पदाच्या निवडीसाठी झालेल्या मतदानाची सोमवारी येथील महर्षी व्यास मंदिराचे सभागृहात शांततेत मतमोजणी पार पडली यात भाजपा शिवसेना -राष्ट्रवादी कांग्रेस(अजित पवार गट ) व आरपीआय प्रणीत सहकार पॅनलचे १७ पैकी १६ जागा पटकावत दणदणीत विजय संपादीत केला आहे तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना (उबाठा गट) यांच्या संयुक्त शेतकरी विकास पॅनलला केवळ एक जागेवर समाधान मानावे लागले आहे.दरम्यान पारंपारिक काँग्रेस -राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला शेतकी संघ महायुतीने प्रथमच काबीज केला आहे.यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे व उपाध्यक्ष हिरालाल चौधरी यांनी सहकार पॅनलचे तर आमदार शिरीष चौधरी व माजी आमदार रमेश चौधरी यांनी शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व केले होते.

सदर निवडणुकीत सोसायटी मतदार संघासाठी ४८ सभासदांनी मतदान केले होते या मतदार संघातून सात उमेदवार निवडून द्यावयाचे होते. यात विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे असून कंसातील मिळविलेल्या मतांची संख्या आहे.सहकार पॅनलचे पांडुरंग दगडू सराफ (३४) प्रवीण भास्कर वारके (३१) डॉ.नरेंद्र वामन कोल्हे (३०)प्रशांत लीलाधर चौधरी (२८)सुनील बाळकृष्ण नेवे (२८) सागर राजेंद्र महाजन (२७) तर महाविकास आघाडीचे अतुल वसंतराव पाटील (२५)यांनी विजय मिळविला आहे.व्यक्तीश: मतदारसंघांमध्ये पाच उमेदवार निवडून द्यावयाचे होते यात संपूर्ण सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले असून त्यात नरेंद्र विष्णू नारखेडे (१,२३३) ,उमेश रेवा फेगडे (११६०),हेमराज जगन्नाथ फेगडे (११३८),धनंजय यशवंत फिरके (१११३),तेजस धनंजय पाटील (९७०),महिला राखीव मतदार संघात दोन उमेदवार निवडून द्यावयाचे होते यात नयना चंद्रशेखर चौधरी (१०५०),आरती शरद महाजन(११६३) ह्या विजयी झाले आहे.नामाप्र वर्गातून नारायण शशिकांत चौधरी (बिनविरोध),अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून एक उमेदवार निवडून द्यावयाचे होते यात अतुल भागवत भालेराव (९८८) हे विजयी झाले आहेत.विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातून एक जागा निवडून द्यावयाची होती यात तुषार सांडूसिंग पाटील (१२१८) हे विजयी झाले आहेत.दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी नंदकिशोर मोरे यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी के.व्ही.पाटील, विजयसिंह पाटील,दस्तगीर तडवी,गोकुळ चौधरी व सहकार्यांनी काम पाहिले तर पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.प्रसंगी मतमोजणीनंतर येथील खरेदी विक्री संघाचे सभागृहात विजय सभा पार पडली यात जिल्हा परिषदेचे माजी सभापती रवींद्र पाटील,शरद महाजन,नरेंद्र नारखेडे,नारायण चौधरी,हिरालाल चौधरी,अमोल जावळे,भाजपाचे तालुका सचिव विलास चौधरी यांच्यासह महायुतीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.