सूरत-पोलीस नायक(वृत्तसेवा):- सूरत(गुजरात) येथे घरात गरबा खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.एक दाम्पत्य त्यांच्या फ्लॅटमध्ये मोबाईलवर गाणी लावून गरबा खेळत होते.त्यादरम्यान तरुणाला अचानक भोवळ आली व तो बेशुद्ध होऊन कोसळला.शेजाऱ्यांच्या मदतीने पत्नीने त्याला रुग्णालयात नेले.तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.सूरत लिंबायत पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आकार रेसिडन्सीमध्ये वास्तव्यास असलेल्या दीपक पाटील (वय ३४ वर्षे)यांचा गरबा खेळताना मृत्यू झाला.दीपक पाटील हे मूळचे मालेगावचे आहेत.त्यांची पत्नी देविकासोबत ते सूरतला वास्तव्यास होते ते हिऱ्यांच्या कंपनीत कामाला होते.
३० सप्टेंबरच्या रात्री दीपक पत्नीसोबत मित्राच्या कुटुंबासोबत गरबा खेळण्यासाठी जाणार होते.मात्र मित्राच्या घरी पाहुणे आल्याने त्यांना हा प्लान रद्द करावा लागला.त्यामुळे दीपक आणि देविकाने आपल्या फ्लॅटच्या हॉलमध्येच गरबा खेळायचे ठरवले.मोबाईलवर गाणी लावून दोघांनी ठेका धरला.गरबा खेळता खेळता देविका थकल्या व त्या एका जागी बसल्या.मात्र दीपक गरबा खेळत होते.रात्री १० च्या सुमारास दीपक यांना भोवळ येऊन बेशुद्ध होऊन पडले.देविका यांनी तातडीने शेजाऱ्यांच्या मदतीने दीपक यांना रुग्णालयात दाखल केले.मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.दीपक आणि वेदिका यांचा विवाह ४ वर्षांपूर्वी झाला होता.दीपक यांच्या अकाली एक्झिटमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.दीपक यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.या घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल रविंद्र करत आहेत.