Just another WordPress site

इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याच्या सूचना-राज्य सरकारचा निर्णय

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.९ फेब्रुवारी २४ शुक्रवार

राज्यातील इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने जीआर काढला असून त्यानुसार इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याच्या सूचना राज्य सरकारने सर्व शाळांना केल्या आहेत.राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला.राज्यातील शिक्षण तज्ज्ञ,शिक्षण प्रेमी, पालक आणि प्रशासनातील अधिकारी यांचे अभिप्राय यामार्फत नोंदवण्यात आले त्यानुसार काही बाबी शिक्षण विभागाच्या समोर आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळा विशेषतः खाजगी शाळा भरण्याच्या वेळा या सकाळी सातनंतर आहेत.आधुनिक युगातील बदलेली जीवनशैली,मनोरंजनाची विविध साधने,शहरातील उशिरापर्यंत सुरू असलेल्या ध्वनिप्रदूषण उदा. वाहनांचा आवाज,विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजविले जाणारे कर्कश संगीत इ अशा अनेकविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत आणि सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे.पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण होत नसल्याने सकाळी लवकर शाळेत जाण्यास तयार नसतात याचा त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो तसेच सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस आणि व्हॅनद्वारे नेताना स्त्यावरील धुके, पाऊस यामुळेही अडचणी निर्माण होतात त्यामुळे शाळांच्या वेळेत बदल करून प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या सत्राचा विचार करावा असे यातून समोर आले.

????????????????????अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेज डोंगर कठोरा येथील प्राचार्य नितीन झांबरे सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!
???????????????????? शुभेच्छुक :- पोलीस नायक न्यूज पेपर (महाराष्ट्र राज्य)

या परिस्थितीचा विचार करता सकाळी ९ पूर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याच्या वेळात बदल करणे आवश्यक आहे असे सरकारने परिपत्रकात नमूद केले आहे तसेच शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घेण्याच्या सूचना सरकारेन केल्या आहेत तसेच  ज्या शाळेच्या व्यवस्थापनाच्या आपल्या शाळांची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल तर त्यांच्या अडचणी त्यांनी संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरिक्षक यांच्याकडे सोपवावी असे शासनाकडून नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.