मधुसूदन कोवे,पोलीस नायक
यवतमाळ जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.९ फेब्रुवारी २४ शुक्रवार
तालुका स्तरावर राळेगाव पंचायत समितीच्या वतीने खेळ व क्रीडा महोत्सवाचे नुकतेच आयोजन करण्यात आले.सदर महोत्सवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आष्टा येथील शाळेचे विद्यार्थी “क” गटात सहभागी झाले होते.
अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेज डोंगर कठोरा येथील प्राचार्य तसेच माझे जिवलग मित्र व वरिष्ठ बंधू मा.श्री.नितीन झांबरे सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!
???????????????????? शुभेच्छुक :- श्री.बाळासाहेब व्ही.आढाळे,मुख्य संपादक पोलीस नायक न्यूज पेपर (महाराष्ट्र राज्य)????????????????????????
या सांस्कृतिक कार्यक्रमात ” लेक वाचवा लेक शिकवा ” यांत प्रथम क्रमांक पटकावला तर या नाटिकामध्ये इश्वरी पावडे,श्रावणी श्रीरामे,सानिध्या भगत,इश्वरी बोरवार,नंदिनी शेंडे,निशा पारीसे,आयुष्य बोरवार,दर्पण पारीसे,तरुण करलुके,आदित्य उईके व ओम वरठी यांचा सहभाग राहिला.तसेच “कॅरम” मध्ये मयुर बोरवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर ” लांब उडी ” मध्ये प्रतिज्ञा सोनवणे या मुलीने द्वितीय क्रमांक पटकावला होता.या महोत्सवात मुख्य व्यवस्थापक आणि मार्गदर्शक म्हणून उच्च-श्रेणी मुख्याध्यापक उत्तम पवार तसेच शाळेचे शिक्षक सुनिता ओंकार,सुहासिनी खेरडे,विरेंद्र सलाम,प्रभाकर रामगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील विद्यार्थ्यांनी विशेष यश प्राप्त केले आहे.सदर यशाबद्दल आष्टा गावातील लोकांनी शाळेच्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे विशेष कौतुक केले जात आहे.