Just another WordPress site

तुमचे आई-वडील येत्या निवडणुकीत मला मतदान करत नसतील तर दोन दिवस जेवू नका.”

शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसमोर अजब वक्तव्य

हिंगोली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१० फेब्रुवारी २४ शनिवार

वेगवेगळी वादग्रस्त वक्तव्ये करून नेहमी चर्चेत राहणारे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या नव्या वक्तव्यामुळे ते वादात अडकले आहेत.आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली येथील एका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना एक अजब सल्ला दिला आहे.बांगर विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतानाचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये दिसतंय की,आमदार संतोष बांगर यांनी शाळेतल्या चिमुकल्यांना सांगितले की,“तुमचे आई-वडील येत्या निवडणुकीत मला मतदान करत नसतील तर दोन दिवस जेवू नका.” तसेच बांगर यांनी चिमुकल्या मुलांकडून वदवून घेतले की ते त्यांच्या आई-वडिलांसमोर काय बोलणार? कोणाला मतदान करायला लावणार?

आमदार संतोष बांगर शाळेतल्या चिमुकल्यांना म्हणाले की,“तुमच्या आई-वडिलांना आमदार संतोष बांगरला मतदान करण्यास सांगा.नाहीतर तुम्ही दोन दिवस जेवू नका.तुम्ही जेवला नाहीत आणि आई-वडिलांनी विचारले की तू जेवत का नाहीस? तर त्यांना सांगा की तुम्ही आमदार संतोष बांगर यांना मतदान करा,मी त्यानंतर जेवेन.त्यानंतर संतोष बांगर यांनी विद्यार्थ्यांना विचारले की,तुम्ही तुमच्या आई-वडिलांना काय सांगणार? कोणाला मतदान करायला सांगणार? या प्रश्नांची विद्यार्थ्यांकडून घोकमपट्टी करून घेतली.संतोष बांगर चिमुकल्यांना हा अजब सल्ला देत असताना शाळेतील कर्मचारी,शिक्षिका आणि बांगर यांचे कार्यकर्ते हसत होते.कळमनुरीचे आमदार संतोष बांगर विविध कारणांमुळे नेहमी प्रसिद्धीझोतात असतात.काही दिवसांपूर्वी संतोष बांगर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेले वक्तव्य चर्चेत आले होते.नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाही तर मी भर चौकात फाशी घेईन असे वक्तव्य बांगर यांनी केले होते.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल दिल्यानंतर संतोष बांगर म्हणाले की,अपात्रता आणि शिवसेनेचा निकाल आमच्या बाजूने लागणार हे आम्ही छातीठोकपणे सांगितले होते.पुन्हा एकदा मी छातीठोकपणे सांगतो की,एप्रिल महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील.नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाही तर मी भर चौकात फाशी घेईन नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाहीत असे संजय बांगर यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.