यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ फेब्रुवारी २४ मंगळवार
आदिवासी पारधी क्रांती संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मुकेश साळुंके यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळाच्या वतीने येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आदिवासी प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन नुकतेच सादर करण्यात आले.
यावेळी आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे मुकेश साळुंके यांच्यासह मधुकर पारधी,रमेश साळुंके,मगन पारधी,राहुल शेले,मंगेश माळे, ज्ञानेश्र्वर साळुंके,गुलाब पारधी,लख्खन पारधी,सचिन पारधी,संभाजी पारधी,सुनिल पारधी,आकास पारधी,बापु शेले,शंकर पवार,बाबुसिंग पारधी यांच्यासह संघटनेचे प्रमुख पदाधिकारींच्या शिष्ठ मंडळाने आदिवासी पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांना एमएससीआयटी व सिव्हिल इंजिनिअर कोर्स (सुपरवाझर) हे शिक्षण मोफत देण्यात यावे,आदिवासी पारधी समाजातील शेतकरी बांधवांना शेतीकामासाठी ट्रेक्टर व रोटर थ्रेसर मशिन मिळावे त्याचप्रमाणे प्रकल्प कार्यालया अंतर्गत येणाऱ्या पारधी समाज बांधवांसाठी तालुका पातळीवर सभामंडप बांधण्यासाठी शासनस्तरावर निधी देण्यात यावी,न्युकलेस बजट योजने अंतर्गत उद्योग व्यवसायासाठी लाभार्थ्यांंना मिळणारी रक्कम ५० हजारा पैक्की २५ हजार देण्यात येतात ते पुर्ण मिळावेत व आपल्या प्रकल्प कार्यालयाच्या वतीने संघटनेच्या मदतीने विविध योजनाबाबत जनजागृती करण्यात यावी या संदर्भातील मागण्यांचे निवेदन प्रकल्प कार्यालयास सादर केले.यावेळी प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी सदर शिष्ठ मंडळाला पारधी समाज बांधवांनी केलेल्या शबरी घरकुल योजनांचा आधिकाअधिक लाभ मिळावा,स्वाभिमान शबरी योजने अंतर्गत दोन एकर बागायीत व चार एकर कोरडवाहू जमीन मिळावी यासह आदिवासी पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी यासह विविध मागण्यांना प्राधान्याने लक्ष केन्द्रीत करुन प्रशासनाच्या माध्यमातुन हे प्रश्न सोडविण्याचे सर्वतोपरीने आपण प्रयत्न करणार असल्याचे अरुण पवार यांनी सांगितले आहे.