Just another WordPress site

“सकारात्मक भूमिका घेऊन वाटचाल करता आली पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून भाजपात प्रवेश केला आहे”

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश प्रसंगी अशोक चव्हाण यांची स्पष्टोक्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा लौकिक वाढवला आहे त्यामुळे त्यांचे काम हे वाखाण्याजोगे आहे असून त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला भाजपात प्रवेश दिला त्याचप्रमाणे गृहमंत्री अमित शाह,भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा या सगळ्यांचे आभार मानतो.महाराष्ट्रात सत्ताआधारी आणि विरोधक यांचे संबंध कायमच राजकारणापलिकडे असतात.आज मी आज नवी सुरुवात करतो आहे.मी ३८ वर्षांचा माझा राजकीय प्रवास आहे.मी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रेरणा घेऊन सकारात्मक भूमिका घेऊन वाटचाल करता आली पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून पक्षात प्रवेश केला आहे.मी जिथे होतो तिथेही प्रामाणिकपणे काम केले आहे.आजपासून भाजपात आलो आहे इथेही प्रामाणिकपणेच आणि निष्ठेने काम करणार आहे.माझा जो अनुभव आहे त्यातून भाजपाला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील यासाठी प्रयत्न करणार आहे.मी पक्ष सोडल्यावर अनेक लोक विरोधात बोलत आहेत.व्यक्तिगत स्वरुपाचे दोषारोप मी कुणावर केले नाहीत आणि करणारही नाही.भाजपात येण्याचा निर्णय हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे.मला कुणीही जा सांगितलेले नव्हते मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची सबका साथ सबका विकास ही भूमिका पटल्याने मी भाजपात आलो आहे असेही अशोक चव्हाण म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.