Just another WordPress site

निवडणुकीत बुथ लेवलपर्यंत एकदिलाने काम करा,काँग्रेसला विजयापासून कोणी रोखू शकणार नाही

लोणावळ्याच्या शिबिरात भाजपा सरकार निषेधाचे ठराव एकमताने मंजूर

लोणावळा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१७ फेब्रुवारी २४ शनिवार

येथे आयोजित केलेल्या काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीराचे उद्घाटन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी ऑनलाईन केले. लोकसभा निवडणुकीची परिस्थिती आपल्यासाठी ‘करा किंवा मरा’ अशी असून या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा लागणार आहे.महाराष्ट्रात काँग्रेस व मविआला चांगले वातावरण आहे परंतु त्यासाठी लोकांच्या घरापर्यंत जावे लागणार आहे.मतदार याद्या अद्ययावत कराव्या लागणार आहेत.बुथ लेवल पर्यंत काम करा,बीएलएचे काम निवडणुकीत सर्वात महत्वाचे असून त्यांच्या नियुक्त्या करा. भारतीय जनता पक्षाच्या तोडफोडीच्या व जाती धर्मात भांडणे लावणाऱ्या प्रवृत्तीला लोक कंटाळले असून सर्वांनी एकजुटीने काम केले तर काँग्रेसला विजयापासून कोणीही रोखू शकणार नाही असे मार्गदर्शन सदर शिबिरात उपस्थित पदाधिकाऱ्यांना करण्यात आले असून यात काही ठराव मांडून ते मंजूर करण्यात आले आहेत.

यावेळी पहिला ठराव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेला असून यात भाजपाने ईडी,इन्कम टॅक्स,सीबीआयचा वापर करुन पक्ष फोडण्याचे काम केले असून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून पाडले आहे व विरोधी पक्षातल्या नेत्यांना फोडून विरोधी पक्षच गिळंकृत करण्यात आले आहेत.या गैरकृत्यामध्ये राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांनी संविधानाला काळीमा फासत त्यांना मदत केली आहे तसेच आज तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस आणि अखिल भारतीय युवक काँग्रेसची बँक खाती गोठवली आहेत हा फक्त खाती गोठवण्यापुरता मर्यादीत नाही हा लोकशाही आणि संविधानाचा गळा दाबण्याचा प्रकार असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करत आहे असा ठराव मांडला त्यास माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी या ठरावाला अनुमोदन दिले व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

तसेच केंद्रातील भाजपचे नरेंद्र मोदी सरकार संविधान आणि लोकशाहीला पायदळी तुडवून हुकुमशाही वृत्तीने काम करीत असून मोदी सरकार आपल्या धोरणांमधून देशातील गरीब,शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,अल्पसंख्यांक,तरूण,महिला या सर्व समाज घटकांवर अन्याय करत आहे त्याचबरोबर देशातील हजारो शेतकरी दोन वर्षापूर्वी काळे कृषी कायदे मागे घ्यावेत आणि शेतमालाला हमीभाव द्यावा या मागणीसाठी वर्षभर आंदोलन करत होते या आंदोलनात जवळपास एक हजाराहून अधिक शेतक-यांचा मृत्यू झाला होता त्यानंतर सरकारने हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते पण ते पाळले नाही त्यामुळे दोन वर्षानंतर पुन्हा लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत.सदरहू सरकार त्यांचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी त्यांच्या मार्गात खिळे ठोकत असून रस्ते बंद करून शेतक-यांवर अश्रूधुरांच्या नळकांडी फोडत आहे, पेलेट गन्सचा वापर करत आहे,यात शेकडो आंदोलक शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत.आपले नेते राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्ष सत्तेत आल्याबरोबर हमी भावाचा कायदा करू असे सांगितले आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी खंबीरपणे शेतक-यांच्या पाठीशी उभी असून शेतक-यांचा आवाज दडपणा-या केंद्रातील मोदी सरकारचा धिक्कार करत आहे हा ठराव आमदार संग्राम थोपटे यांनी मांडला तर विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे प्रतोद आ.सुरेश वरपुडकर यांनी या ठरावाला अनुमोदन दिले आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने एकमताने हा ठराव मंजूर केला.

सदर शिबीराला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,प्रभारी रमेश चेन्नीथला,विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे,पृथ्वीराज चव्हाण,विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील,आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे,गोवा,दीव दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे,माजी मंत्री नितीन राऊत,अमित देशमुख,सुनिल केदार,माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार,प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान,आ.प्रणिती शिंदे, AICC सचिव व सहप्रभारी आशिष दुआ,सोनल पटेल,पृथ्वीराज साठे,प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे,प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे,सरचिटणीस प्रमोद मोरे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.