Just another WordPress site

आग्रा किल्ल्यावर दुमदुमणार शिवरायांचा जयघोष ! ‘दिवाण-ए-आम’मध्ये साजरी होणार शिवजयंती !!

आग्रा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

महाराष्ट्रासह देशभरात आज शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रात किल्ले शिवनेरीवर शिवजन्माचा उत्सव आयोजित करण्यात आला आहे.सदर कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील मान्यवर नेतेमंडळींची या सोहळ्याला हजेरी असेल मात्र त्याचवेळी गेल्या वर्षीपासू सुरू झालेल्या आग्र्यावरील शिवजयंती उत्सवाचीही जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.यंदा सलग दुसऱ्या वर्षी आग्र्यामध्ये शिवरायांच्या जयंतील उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी पहिल्यांदाच आग्र्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.यंदा या उत्सवाचे दुसरे वर्ष असून त्याची जोरदार तयारी आग्र्यात करण्यात येत आहे.३९४ व्या शिवजयंती उत्सवासाठी आग्रा नगरी सजली असून आज संध्याकाळी ७ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल व रात्री साधारण १० वाजेपर्यंत या सोहळ्यात विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.आग्र्यातील या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार,खासदार उदयनराजे भोसले आदी नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.