Just another WordPress site

“उद्धव ठाकरे लवकरच पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील आणि एकनाथ शिंदेंचे नेतृत्व मान्य करतील”-अपक्ष आमदार रवी राणा यांचा दावा

गोपाल शर्मा,पोलीस नायक

विदर्भ विभाग प्रमुख

दि.१९ फेब्रुवारी २४ सोमवार

सध्या उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीचा प्रचार करत राज्याच्या विविध भागांचे दौरे करतांना दिसत असून इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि भाजपावर जोरदार टीका करतांनाही दिसत आहेत.आमचे हिंदुत्व (इंडिया आघाडी) घरातली चूल पेटवणारे आहे आणि भाजपाचे हिंदुत्व घरे पेटवणारे आहे असाही दावा ते आपल्या भाषणांमधून करत आहेत.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे वक्तव्य केले जात आहे.अशात उद्धव ठाकरेंबाबत एका अपक्ष आमदाराने एक मोठा दावा केला आहे.उद्धव ठाकरे लवकरच पंतप्रधान मोदींना साथ देतील असे या आमदाराने म्हटले आहे.विधासनभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील असा दावा एका अपक्ष आमदाराने केला आहे.एवढच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व उद्धव ठाकरे मान्य करतील असेही या अपक्ष आमदाराने म्हटले आहे हे आमदार दुसरे तिसरे कुणी नसून अपक्ष आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंना अहंकारी नेता असेही म्हटले आहे.

महाविकास आघाडी सरकार असतांना हनुमान चालीसा मातोश्रीसमोर म्हणणार असे आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी म्हटले होते त्यावरुन बराच राडा झाला होता ज्यानंतर या दोघांनाही तुरुंगात डांबण्यात आले होते.आता याच रवी राणा यांनी उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी बेचैन झाले आहेत असे म्हटले आहे.येणाऱ्या काळात मला विश्वास आहे की विधानसभा निवडणूक होण्याआधी अहंकारी उद्धव ठाकरे हे बेचैन झाले आहेत.मोदींना कधी भेटतो व त्यांची माफी कधी मागतो आणि कधी त्यांना पाठिंबा देतो असे उद्धव ठाकरेंचे झाले आहे.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर त्यांना पडला होता.आता मातोश्रीवर त्याचे चिंतन सुरु आहे. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत.काही लोकांच्या माध्यमांतून भाजपाशी संपर्क करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत.विधानसभेपूर्वी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते पाठिंबा देतील तसेच काँग्रेसह त्यांनी जी आघाडी केली आहे.राष्ट्रवादीसह जी आघाडी केली आहे त्यांना बाय-बाय करतील असा दावा रवी राणांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.