मी कुणाशीही संपर्क केलेला नाही तसेच भाजपाच्याही एकाही नेत्याने माझ्याशी संपर्क केलेला नाही हे मी स्पष्ट करतो.शिवाय आमचा पक्ष फुटला आहे आमच्या पक्षातून काही लोक निघून गेले आहेत मात्र आता आमचा पक्ष महाराष्ट्रातल्या तरुणांना घेऊन पुढे येतो आहे.आमचा हा प्रयत्न आहे की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही चांगली कामगिरी करु असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीशी तलाक घेतला आहे आता आम्ही विकासाचा संसार करतोय असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले होते यावर विचारले असता जयंत पाटील म्हणाले,“कुणाशी कितीवेळा तलाक घेतला हा मुद्दा महत्त्वाचा नाही आत्ता ते जिथे आहेत तिथे सुखी आहेत का? तिथे सुखी असतील तर काही कुणाचे म्हणणे नाही पण ते तसे दिसत नाही हीच तर महाराष्ट्रापुढे असलेली शोकांतिका आहे असे म्हणत जयंत पाटील यांनी गुलाबरावांना उत्तर दिले आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ फेब्रुवारी २४ सोमवार
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपा प्रवेशाच्या चर्चा फेटाळून लावल्या असून मी कुठेही जात नाही व मी जिथे आहे तिथेच आहे असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीवर महत्त्वाचे भाष्य केले आहे.दि.२ जुलै २३ ला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह आमदारांचा एक गट सरकारमध्ये सहभागी झाला.अजित पवार सध्याच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत.अजित पवारांनी थेट शरद पवारांनाच आव्हान देत दंड थोपटले आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आहे.महाविकास आघाडीतले दोन महत्त्वाचे पक्ष असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष भाजपाने खुबीने फोडले आहेत इतकेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह देखील अजित पवारांना देण्यात आले आहे या सगळ्या परिस्थितीवर जयंत पाटील यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे.लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते अशी स्थिती आहे.या निवडणुकीच्या तोंडावर देशपातळीवर भाजपात आणि एनडीएत इनकमिंग वाढले आहे तर महाराष्ट्रात महायुतीमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर येत आहेत.काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला.मिलिंद देवरा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले तर बाबा सिद्दीकी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर गेले.काँग्रेसचे दिग्गज समजले जाणारे हे नेते महायुतीत गेले.आता आज सकाळपासूनच जयंत पाटील भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही वक्तव्य केले मात्र भाजपा प्रवेशाच्या या सगळ्या चर्चा जयंत पाटील यांनी फेटाळल्या आहेत तसेच राष्ट्रवादीतल्या फुटीवर त्यांनी भाष्य केले आहे.