Just another WordPress site

“ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण”, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२० फेब्रुवारी २४ मंगळवार

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आणि आम्ही मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून आज कुठलेही राजकीय भाष्य मी करणार नाही.मराठा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे यासाठी आपल्याला सर्वानींच सहकार्य केले.मी जे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता केल्याचे समाधान मला आहे असे मुख्मयंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सगळ्या मंत्र्यांचे जे सहकार्य लाभले त्यामुळेच आपण हा निर्णय घेत आहोत.मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.महाराष्ट्र विधानमंडळ या वास्तूत अनेक ऐतिहासिक निर्णय झाले आहेत.आजही ही वास्तू त्या उज्ज्वल परंपरेचा भाग होते आहे.ना कुणावर अन्याय असा निर्णय हा आपण घेतो आहे.मुख्यमंत्री असूनही मी आंदोलनकर्त्यांना भेटावे लागले.मी मुख्यमंत्री आहे म्हणून प्रोटोकॉल म्हणून मी त्यांना भेटणार नाही असे मी केलेले नाही.मी बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीची आठवण करत आंदोलनकर्त्यांना भेटलो.माझ्या पदाचा आब वगैरे काही मी मानला नाही असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

काही लोक म्हणाले एकनाथ शिंदेंनी वेळ मारुन नेली,काही जण म्हणाले की एकनाथ शिंदे शब्द पूर्ण करणार नाहीत पण आम्ही शेतकरी हिताचे,कष्टकरी जनतेचे आणि महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले आहे.कुणालाही शब्द देताना आम्ही आश्वासन पूर्ण करता येईल असेच शब्द देतो.माझ्यावर लोकांवर अनेक विश्वास ठेवतात कारण मी दिलेला शब्द पाळतो म्हणून माझ्यावर लोक विश्वास ठेवतात.एकदा शब्द दिला की मागे हटत नाही.मला राजकीय बोलायचे नाही.हा जो निर्णय आहे तो मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्याबरोबरच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.काही अनुचित प्रकार आंदोलनांच्या दरम्यान घडले पण ते घडायला नको होते असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळेच आपण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आजचा दिवस निवडला.आम्ही १५० दिवस मेहनत आजच्या दिवसासाठी होती.तीन लाख लोक काम करत होते.सगळ्यांचे एकच उद्दीष्ट होते की दिवसरात्र काम करुन आपल्याला मराठा आरक्षण देण्यासाठी अहोरात्र झटले.देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील हेच सांगत होते की मराठा समाजाला आपण आरक्षण दिले पाहिजे.मराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण हाच पर्याय होता असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे हीच भावना आपली सगळ्यांची आहे.चर्चेतून योग्य मार्ग निघाला पाहिजे आणि राज्यातल्या सर्व समाज बांधवांनाही मी हेच आवाहन करतो.प्रत्येक घटकाला मी हेच आवाहन करतो असेही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.