यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ फेब्रुवारी २४ बुधवार
शासन निर्णयानुसार पोलीस पाटील यांना ग्रामपंचायतीने आपल्या कार्यालयात टेबल खुर्ची उपलब्ध करून द्यावी असा निर्णय घेतला होता व त्या अनुषंगाने पाडळसे पोलीस पाटील सुरेश खैरनार यांनी सरपंच गुणवंती पाटील व उपसरपंच अलका सोनवणे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना याबाबत अवगत केले.परिणामी पाडळसे सरपंच,उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी तसेच सर्व सदस्य यांनी तात्काळ निर्णय घेऊन पोलीस पाटील यांना कायदा आणि सुव्यवस्था तसेच महसूल विभागाने वेळोवेळी दिलेली कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी स्वतंत्र कार्यालय टेबल आणि खुर्ची उपलब्ध करून दिली आहे.याबद्दल पोलीस पाटील सुरेश खैरनार यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.
यानिमित्ताने झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात सरपंच गुणवंती पाटील,उपसरपंच अलका सोनवणे,उपसरपंच हेमलता बऱ्हाटे,ग्रामविकास अधिकारी सी.एच.वाघमारे,सदस्या सुरेखा कोळी,उज्वला पाटील,कविता कोळी,पल्लवी तायडे,पुनम पाटील,अरुण चौधरी,नामदेव कोळी, प्रकाश पाटील,किरण तायडे,तुषार भोई,सामाजिक कार्यकर्ते आनंद तायडे,संजय कोळी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.