Just another WordPress site

डोंगर कठोरा येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहादरम्यान श्री ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाटप

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२३ फेब्रुवारी २४ शुक्रवार

तालुक्यातील डोंगर कठोरा येथे वै.ह.भ.प.झेंडुजी महाराज बेळीकर,कै.गुरुवर्य जगन्नाथ महाराज व कै.सद्गुरू नारायण महाराज यांच्या कृपेने तसेच श्री.विठ्ठल मंदिर पंचवटी डोंगर कठोरा यांच्या वतीने दि.२२ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी २४ दरम्यान श्री.ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.सदरहू काल दि.२२ फेब्रुवारी गुरुवार रोजी सदरील श्री.ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाची सुरुवात श्री.ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाटप करून मोठ्या उत्साहात करण्यात आली.

यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या प्रसंगी ह.भ.प.श्री.भगवान शालिकग्राम पाटील व त्याच्या पत्नी ह.भ.प.सौ.माधुरी भगवान पाटील यांच्या वतीने श्री.विठ्ठल रुख्माई पूजन करून तसेच त्यांच्याच हस्ते श्री.ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाटप करून श्री.ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.यावेळी ह.भ.प.श्री.भगवान शालिकग्राम पाटील व त्याच्या पत्नी ह.भ.प.सौ.माधुरी भगवान पाटील यांच्या हस्ते उपस्थित ६६ महिलांना श्री.ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाटप करण्यात आले.दरम्यान ह.भ.प.श्री.दिनकर महाराज व ह.भ.प.श्री.दत्तात्रय महाराज यांच्या वतीने श्री.ज्ञानेश्वरी पारायण वाचन करण्यात आले.यावेळी ह.भ.प.श्री.दिनकर महाराज,ह.भ.प.श्री.दत्तात्रय महाराज,नामदेव झोपे,रवींद्र पाटील,सुरेश भिरूड,ज्ञानदेव तळेले,गोपाळ आमोदे,दिनेश झोपे,खुशाल कोळी,धर्मा बाऊस्कर,राहुल आढाळे,पांडुरंग जावळे,रेवानंद पाटील,ज्ञानेश्वर पाटील,जगदीश मुऱ्हेकर,डालू फेगडे,नारायण फेगडे,लता सुभाष पाटील,तुषार झांबरे,लोकेश झांबरे,दर्शन पाटील,उमेश ठोंबरे,उमेश कोळी,केवल राणे,हितेश राणे,किशोर कोल्हे,पवन पाटील,रुपेश पाटील,योगेश राणे,आशिष पाटील,निलेश पाटील,राजेश गाजरे,राज गाजरे,सागर झोपे,गुणवंत झांबरे,गुणवंत भिरूड,हर्षल भिरूड,मिलिंद भिरूड,बबलू झोपे,राजेश कोलते,जयंत चौधरी यांच्यासह समस्त श्री.विठ्ठल मंदिर पंचवटी,गढीवरील विठ्ठल मंदिर,स्वामीनारायण मंदिर भजनी मंडळ व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.