Just another WordPress site

यावल शहरात स्वाईन फ्यु आजाराचा कहर ; ८०० डुकरांचा मृत्यु !! नगर परिषदचे दक्षता घेण्याचे आवाहन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२४ फेब्रुवारी २४ शनिवार

येथील नगर परिषद कार्यक्षेत्रात स्वाईन फ्यु या विषाणुजन्य आजाराने सुमारे ८०० डूकरांचा मृत्यु झाल्याची माहिती नगर परिषदचे स्वच्छता अधिकारी सत्यम पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना दिली आहे.दरम्यान सदरील घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत प्रत्येक शहरवासीयांनी दक्षता घेवुन असुन डुकर मरण पावल्याची माहिती मिळताच सफाई कर्मचारी तात्काळ त्या ठिकाणी पहोचुन त्या मेलेल्या जनावरांची विल्हेवाट लावत असून शहरवासीयांनी घाबरून न जाता आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच दक्षता घेण्याचे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरातील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात मागील काही दिवसांपासुन विविध ठिकाणी अफ्रीकन स्वाईन फ्यु या विषाणुजन्य अशा आजाराने मोठया प्रमाणावर डुकरांचा मृत्यू होत असुन मरण पावलेल्या डुकरांची दुर्गंधीही अत्यंत वेगाने परिसरात पसरत असुन नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान या संदर्भात यावल नगर परिषदचे आरोग्य अधिकारी सत्यम पाटील यांच्याकडून जाणुन घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की,सदरची डुकर या जनावरांवर अफ्रीकन स्वाईन फ्यु या विषाणुजन्य आजाराची लागण झाली असुन आपण या बाबतची दक्षता घेत पशुसंवर्धन अधिकारी यांना याची जाणीव एक महीना आधीच करून दिली असल्याचे सत्यम पाटील यांनी सांगीतले आहे.सदरहू या आजारामुळे आतापर्यंत सुमारे ८०० च्या जनावरांचा मृत्यु झाला असुन नगर पालिकेच्या वतीने खबरदारीची उपाययोजना म्हणुन शहरातील शेकडो जनावरे स्थलांतरीत करून इतर ठीकाणी पाठविण्यात आले आहे.परिणामी शहरवासीयांनी घाबरून न जाता खबरदारी बाळगण्याचे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने आरोग्य व स्वच्छता अधिकारी सत्यम पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.