Just another WordPress site

तुतारी चिन्हाचे रायगडावर अनावरण ; “तुतारी जनतेला प्रेरणा देईल”-शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास

निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला तुतारी दिली असून संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे.तुमच्या संघर्षातून,त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे.या ऐतिसाहिक भूमीत आपण आलोय.या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करुया असे आवाहन शरद पवारांनी केले. तुतारी हे राज्याचे ऐतिहासिक वाद्य असून त्यामुळे पक्षाला ऐतिहासिक चिन्ह मिळाले असल्याचा दावा सातत्याने केला जातोय.यानिमित्ताने या पक्षाच्या चिन्हाचे अनावरण आज रायगड किल्ल्यावर करण्यात आले.वयोमानानुसार शरद पवारांना रायगड किल्ला सर करणे अवघड होते परंतु रोपवे आणि पालखीमुळे त्यांना रायगड किल्ल्यावरचा प्रवास सुकर झाला.आधी ते रोप वेने रायगडावर पोहोचले तर नंतर त्यांनी पालखीचा आधार घेतला.जवळपास ४० वर्षांनंतर ते किल्ले रायगडावर आज आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.