यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२७ फेब्रुवारी २४ मंगळवार
येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक असा निरोप समारोपाचा कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने स्कुलच्या सभागृहात पार पडलेल्या निरोप समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष राजेंद्र महाजन हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा सदस्य शशिकांत फेगडे,मंगला फेगडे,सरस्वती विद्या मंदिर शाळेचे नरेंद्र महाले व फैजपूर येथील डी.एन.कॉलेजचे सचिन भिडे इत्यादि मान्यवर उपस्थित होते.कार्यकमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका शिला तायडे यांच्या हस्ते प्रमुख अतिथींचे स्वागत व सत्कार करण्यात आला.यावेळी शशिकांत फेगडे,नरेंद्र महाले तसेच सचिन भिडे यांनी इयता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन पर असे भाषण करून त्यांना शैक्षणीक भावी वाटचालीस व आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी आपल्या शाळेतील बालपण जिवनाचे अनुभव आपल्या विचारातुन व्यक्त केली तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झीनत शेख यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेकरिता सरदार वल्लभभाई पटेल स्कुलचे सर्व शिक्षीका,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.