Just another WordPress site

यावल येथे आदिवासी एकता परिषदेतर्फे आयोजित मोर्चा लिखित आश्वासनाने यशस्वी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१ मार्च २४ शुक्रवार

भुमिहीन दारिद्रयरेषेखालील आदिवासींना शासनाच्या सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या जमिनी बाबत शेतकऱ्यांनी जमीन विक्री प्रस्ताव एकात्मिक आदिवासी व प्रकल्प विकास कार्यालयास सादर केलेले असुन त्या जमिनी तात्काळ खरेदी करून आदिवासींना वितरित करण्यात यावी तसेच आदिवासी विभागाकडून दिनांक २ ऑगस्ट २२ रोजीच्या पत्र क्रमांक प्र. क्र./का७ ( ३ ) यावल २०९९ अन्वये जिल्ह्यातील शासकीय महामंडळाच्या प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या व वापरात नसलेल्या जमिनी तसेच ५ वर्षानंतर एखाद्या कार्यासाठी संपादीत केलेल्या जमिनी वापर विना परत करण्यात आलेल्या आहेत अशा जमिनी देखिल सदर योजनेअतर्गत आणुन त्या वितरीत करण्यात याव्या यासह आदिवासी बांधवांच्या निगडीत विविध समस्या व आदी मागण्यांसाठी आदिवासी एकता परिषद भारत या संघटनेच्या वतीने आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव सुनिल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मोठया संख्येने आदिवासी समाज बांधवांनी मोर्चा काढून प्रकल्प अधिकारी यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.

दरम्यान प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांची आदिवासी एकता परिषदचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनिल गायकवाड यांच्यासह संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनको,संघटनेचे जिल्हा प्रधान यशवंत अहिरे,संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष शुभांगी पवार,जिल्हा सचिव भगवान मोरे,जिल्हा सहसचिव मुकेश वाघ,महेन्द्र मोरे,सदु भिल,राजु गायकवाड,भुरा भिल यांच्या शिष्ठमंडळाने भेट घेवुन आदिवासी बांधवांसाठी मिळणाऱ्या विविध प्रलंबीत योजनांच्या संदर्भात सविस्तर चर्चा करून योजनांची अमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी केली.यावेळी प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी शिष्टमंडळास त्यांनी केलेल्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत शासनाच्या माध्यमातुन तात्काळ आपल्या मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लिखित आश्वासन दिल्याने सदरील आंदोलन यशस्वीरीत्या मागे घेण्यात आले असल्याचे आदिवासी एकता परिषद भारत या संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.