यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१ मार्च २४ शुक्रवार
तालुक्यातील शिरसाड येथील कार्यकर्ते रितेश समाधान पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजीत पवार गट) तालुका अध्यक्षपदी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या वतीने नुकतीच निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बळकटीकरणासाठी व सर्वसामान्यापर्यंत पक्षाची ध्येय धोरण पहोचविण्यासाठी व त्यांच्या उत्थानासाठी आपण कार्य करावे याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यावल तालुका अध्यक्षपदी रितेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.रितेश पाटील यांच्या निवडीचे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुर्नवसनमंत्री ना.अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजीक व न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष विलास अडकमोल, यावल तालुका कार्यध्यक्ष जितेन्द्र सोनवणे,यावल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजेन्द्र करांडे,गुणवंत निळ,अॅड. देवकांत पाटील,गणेश तायडे,जुगल पाटील,आकाश चोपडे,मोहन कोळी,भरत चौधरी यांच्यासह आदी मान्यवरांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.