अकोला-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१ मार्च २४ शुक्रवार
आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकतो.ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीत जागावाटपाला वेग आला आहे.नुकतेच २७ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक झाली.या बैठकीत जागावाटपाच्या सूत्रावर चर्चा करण्यात आली.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधीही उपस्थित होते. दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी याच लोकसभा निवडणूक आणि भाजपाची रणनीती महत्त्वाचे विधान केले आहे.भाजपाने देशात १५० जागा जिंकून दाखवाव्यात असे आव्हानच प्रकाश आंबेडकरांनी दिले आहे.भाजपाने फक्त १५० जागा जिंकून दाखवाव्यात.निवडणुकीच्या मैदानात त्यांनी १५० जागा जिंकल्या तरी फार मोठी गोष्ट आहे असे मी मानतो.भाजपाला चुकीची माहिती मिळत आहे.पक्ष फोडून आम्ही ४०० पेक्षा अधिक जागा जिंकू असे त्यांना वाटत आहे.ते पक्ष फोडू शकतील,नेते विकत घेऊ शकतील मात्र ते मतदारांना विकत घेऊ शकणार नाहीत.मतदार त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.