“शिखर बँक घोटाळ्यांच्या प्रश्नावर फडणवीसांची जीभ अडखळत असेल तर….. ?”
शिखर बँक घोटाळा प्रकरणावर संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते.नवाब मलिक यांच्या बाजूला आम्ही अजित पवार यांनाही तुरुंगात पाठवू असे फडणवीस सांगत होते.आता अजित पवार आणि नवाब मलिक हे दोन्ही लोक भाजपाबरोबर आहेत याबाबत फडणवीसांना विचारले पाहिजे.फडणवीस लोकांशी खोटे बोलत आहेत.देशाशी,राज्याशी ते खोटे बोलत आहेत अशी टीकाही राऊत यांनी केली.लोकसभा निवडणुकी आधी धर्म,जात,धार्मिक स्थळ यांचा वापर करता येणार नाही असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे यावही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.निवडणूक आयोगावर माझा विश्वास नाही.निवडणूक आयोग ‘मोदी-शाह कमिशन’ झाले आहे.आम्ही सर्वजण नियमांचे पालन करणार आहोत मात्र भाजपाचे दोन-चार लोक नियमांना फाट्यावर मारतात.कर्नाटकच्या निवडणुकीत हे पाहायला मिळाले असे मत राऊत यांनी व्यक्त केले आहे.