यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.४ मार्च २४ सोमवार
तालुक्यातील मोहराळा-हरिपुरा ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच ,ग्रामसेवक व सदस्यांनी संगनमताने केलेल्या शासकीय निधीच्या भ्रष्ठाचाराची चौकशी करण्यात यावी या मागणी करीता बहुजन युथ पॅथरच्या वतीने सतिष अडकमोल यांनी मोहराळा ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणाला सुरूवात केले असून आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे.
मोहराळा तालुका यावल येथील ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातुन शासनाच्या वतीने गावाच्या विकासासाठी मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या निधीची परस्पर विल्हेवाट लावुन आपल्या भ्रष्टाचाराचे पितळ ग्रामस्थांसमोर उघडे पडू नये यासाठी सलग दोन वर्ष कुठलीही ग्रामसभा,महिला सभा,वार्ड सभा न घेणाऱ्या व खोटी बनावट स्वाक्षरीची ग्रामसभा दाखणाऱ्या व ग्रामस्थांची दिशाभुल करणाऱ्या सरपंच,ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे लिखित निवेदन यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांना दि.३o जानेवारी रोजी दलित बुथ पॅन्थरचे जळगाव जिल्हाध्यक्ष सतिष अडकमोल यांच्या वतीने देण्यात आले होते.दरम्यान या पत्राच्या अनुषंगाने कालावधी पुर्ण झाल्यावर देखील पंचायत समिती यावल प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची चौकशी किंवा कारवाई करण्यात आली नसल्याने अखेर दि.२ मार्च २४ शनिवार रोजी सतिष अडकमोल यांनी मोहराळा ग्रुप ग्रामपंचायत समोर आपले आमरण उपोषण सुरू केले आहे.सदर उपोषणाला हरीपुरा व मोहराळा या गावाचे ग्रामस्थ व विविध सामाजीक संस्थांचा पाठींबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.