मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ मार्च २४ गुरुवार
शेतकऱ्यांचे उत्पन्न आम्ही दुप्पट करणार आहोत असे आश्वासन मोदी सरकार देत असून मागची दहा वर्षे मोदी सत्तेत आहेत तेव्हा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले का? उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या.शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली हीच मोदी गॅरंटी दिली अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली आहे.इतकेच नाही तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी मोदींना आव्हानही दिले आहे.आदर्श घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा हात आहे असा आरोप भाजपाने केला.भाजपाने काढलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे त्यानंतर सातव्या दिवशी अशोक चव्हाण भाजपात गेले व त्यानंतर पंधराव्या दिवशी भाजपाचे खासदार झाले.राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचारी पार्टी असे म्हणाले,राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागात घोटाळ्याचा आरोप केला असेही शरद पवार म्हणाले तसेच यावरुनच आता शरद पवारांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे.
आमच्यावर आरोप झाल्यानंतर मी मोदींना म्हटले हिंमत असेल तर चौकशी करा.दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाऊ द्या मात्र पुढे काय घडले ? ज्यांच्यावर आरोप केले तेच आज भाजपासह जाऊन बसले त्यामुळे भाजपा ही वॉशिंग मशीन झाली आहे.आधी आरोप करायचे मग पक्ष प्रवेश देऊन त्यांना धुवून काढायचे अशी टीका शरद पवार यांनी लोणावळ्यातल्या त्यांच्या भाषणात केली.इतकेच नाही तर मोदींकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचेही ते म्हणाले. मोदींकडून सत्तेचा गैरवापर केला जातो आहे.झारखंड,दिल्ली या राज्यांत तेच घडले.नोटीस द्यायची,समन्स बजावायचे आणि तुरुंगात टाकायचे.आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अटक होऊ शकते असेही शरद पवार म्हणाले.पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही.जवाहरलाल नेहरूंबद्दल काहीही बोलले जात आहे. गांधी,सुभाषबाबू,जवाहरलाल नेहरू यांचे योगदान हे देश स्वतंत्र करण्यासाठी होते अशा लोकांची नोंद जाणकारांनी घ्यायचे असते.आज देशाचे पंतप्रधान प्रत्येक दिवशी पूर्ण पान जाहिरात देत आहेत त्यात मोदींची गॅरंटी देत आहेत पण ही कोणाच्या पैशाने जाहिराती दिली जात आहे ? जनतेच्या पैशाने हे गॅरंटी देत आहे अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.