जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ मार्च २४ बुधवार
रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना.रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या नेतृत्वाखाली डोंगर कठोरा,ता.यावल येथील रहिवाशी व जळगाव येथे वास्तव्यास असलेले मिलिंद सिद्धार्थ तायडे यांची उत्तर महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी नुकतीच निवड करण्यात आली असल्याचे गणेश ठोकळे माजी प्रसिद्धी प्रमुख विलेपार्ले तालुका यांनी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीद्वारे दिली आहे.
पक्षासाठी निःस्वार्थ,पक्षाचा आदेश ध्येय,धोरणे,एकनिष्ठाता व कटिंबधता लक्षात घेऊन मिलिंद तायडे यांच्या योग्य कामकाजची दखल घेत त्यांची उत्तर महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.सदर निवडीबद्दल मुंबई प्रदेश उपाध्यक्ष रतन अस्वारे,सचिव प्रा.अर्जुनराव माघाडे,मुंबई प्रदेश उपाध्यक्ष के.एस.गायकवाड,अलि अहंमद खान, जिल्हा कार्याध्यक्ष किसनराव रोकडे,विलेपार्ले तालुका अध्यक्ष दिपक साळवी,रितेश घायवट,जितेंद्र साळवी,मतीन शेख, किशोर रनशूर,सुदेश कडवे,दिलीप कांबळे,मिलिंद गमरे,प्रमोद गोतपागर,पांडू भंडारे,सूर्यकांत सोरटे,युवराज सोनवणे, काशीबाई सूर्यवंशी,मायावती तांबे यांच्या वतीने मिलिंद तायडे यांना नियुक्तीच्या व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत.