केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार म्हणाले,देशात लोकसभा निवडणूक ५४३ जागांवर निवडणूक होणार आहे.सात टप्प्यात ही निवडणूक होणार असून पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे.

देशात सात टप्प्यात निवडणूक होणार

फेज १ – १९ एप्रिल
फेज २ – २६ एप्रिल
फेज ३ – ७ मे
फेज ४ – १३ मे
फेज ५ – २० मे
फेज ६ -२५ मे
फेज ७ – १ जून

कोणत्या राज्यात किती टप्प्यांत होणार मतदान?

अरुणाचल प्रदेश,अंदमान-निकोबार,आंध्र प्रदेश,चंदीगढ,दादरा नगर हवेली,गोवा,गुजरात,हिमाचल प्रदेश,हरियाणा,केरळ,लक्षद्वीप,लडाख, मिझोराम,मेघालय,नागालँड,पुद्दुचेरी,सिक्कीम,तामिळनाडू,पंजाब,तेलंगणा,उत्तराखंड आदी राज्यांत एका टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे .तसेच कर्नाटक,राजस्थान,त्रिपुरा,मणिपूर या राज्यांमध्ये दोन टप्प्यांत मतदान होईल.तर छत्तीसगड,आसाममध्ये तीन टप्प्यांत मतदान होईल.ओडिशा,मध्य प्रदेश,झारखंड या राज्यांमध्ये चार टप्प्यात मतदान होणार असून महाराष्ट्र,जम्मू आणि काश्मीरमध्ये पाच टप्प्यात मतदान होईल.तसेच उत्तर प्रदेश,बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांत मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात पाच टप्प्यांत होणार मतदान

महाराष्ट्रात ४८ जागांसाठी पाच टप्प्यांत मतदान होणार आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान ५ जागांसाठी मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला होणार असून यावेळी ८ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल.७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेत ११ जागांसाठी मतदान होणार आहे.तर १३ मे रोजी होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील प्रक्रियेतही ११ जागांसाठी मतदान होईल.२० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार असून १३ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल.

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?️

पहिला टप्पा – १९ एप्रिल – रामटेक,नागपूर,भंडारा-गोंदीया,गडचिरोली-चिमूर,चंद्रपूर

️दुसरा टप्पा – २६ एप्रिल – बुलडाणा,अकोला,अमरावती,वर्धा,यवतमाळ-वाशिम,हिंगोली,नांदेड,परभणी

तिसरा टप्पा – ७ मे – रायगड,बारामती,धाराशीव,लातूर,सोलापूर,माढा,सांगली,सातारा,रत्नागिरी-सिंधुदुर्ग,कोल्हापूर,हातकणंगले

चौथा टप्पा – १३ मे – नंदूरबार,जळगाव,रावेर,जालना,छत्रपती संभाजीनगर,मावळ,पुणे,शिरुर,अहमदनगर,शिर्डी,बीड

पाचवा टप्पा – २० मे – धुळे,दिंडोरी,नाशिक,पालघर,भिवंडी,कल्याण,ठाणे,मुंबईतील सहा मतदारसंघ

मतमोजणी – ४ जून २०२४ रोजी करण्यात येणार आहे.