लोकांकडून पैसे घेण्यासाठी भाजपाने वसुली गँग बनवली असून अंमलबजावणी संचालनालय या वसुली गँगमधील एक सदस्य आहे.नरेद्र मोदी हे त्या वसुली गँगचे सूत्रधार आहेत त्यामुळे सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात खटला चालवला पाहिजे.भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डांवर कारवाई व्हायला हवी.या लोकांनी ७ हजार कोटी रुपयांची खंडणी उकळली आहे.आम्हाला ५ ते १० लाख रुपयांच्या अफरातफरीचे खोटे आरोप करून तुरुंगात टाकले आणि हे लोक हजारो कोटी रुपयांची खंडणी वसुल करून निवांत बसले आहेत त्यामुळे सर्वात आधी भाजपावर कारवाई व्हायला हवी.इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर यांच्यावर कारवाई होईल.काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सांगितले आहे की,आमचे सरकार आल्यावर आम्ही कोणालाच सोडणार नाही.मोदी-शाहांना देखील या गोष्टीची भिती आहे.