मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ मार्च २४ सोमवार
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईनचा नारा दिला होता.महायुतीतील सरकारला जनादेश मिळाला तरीही शिवसेना आणि भाजपा यांच्यातील अंतर्गत वादामुळे महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकले परिणामी मी पुन्हा येईन या देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेवरून त्यांना प्रचंड डिवचले गेले यावरून देवेंद्र फडणवीस यांनी आता चोख प्रत्युत्तर दिले असून ते ‘काँग्रेस ना होती तो क्या होता’ या पुस्तकावर आधारित परिसंवादात बोलत होते.सत्ता आणि खुर्चीसाठी उद्धव यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसली. यशासारखे काहीही यशस्वी होत नाही असे म्हटले जाते.मी पुन्हा येईन अस म्हटले होते.आम्ही निवडून आलो पण आमचे सरकार स्थापन झाले नाही त्यामुळे आम्हाला काहीजण अहंकारी म्हणाले हे तर राजकारणात सुरुच राहते असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.मी म्हटले होते की मी पुन्हा येईन.त्याला अडीच वर्षे लागली परंतु अडीच वर्षांनी आलो तर असा आलो की दोन्ही पक्ष फोडून आलो असेही फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांचा हा व्हीडिओ शेअर करत विरोधकांनीही टीका केली आहे.रोहित पवार म्हणाले,राज्यातील पक्ष आणि कुटुंब फोडाफोडीचे महामेरू कोण आहेत याबाबत लोकांमध्ये चर्चा होती पण आज खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच याची कबुली दिल्याने लोकांमधील चर्चेवर शिक्कामोर्तब झाले.पण फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची निती राबवणाऱ्या भाजपाला राज्यातील स्वाभिमानी जनताच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ! असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते त्यामुळे महायुतीचे सरकार स्थापन होईल अशी चिन्ह होती परंतु अंतर्गत वादामुळे महाविकास आघाडीची स्थापना झाली.महाविकास आघाडीच्या निमित्ताने शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले.अडीच वर्षे महाविकास आघाडीने सरकार चालवले परंतु जून २०२२ मध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली आणि महाविकास आघाडीला पायउतार व्हावे लागले त्यानंतर लागलीच वर्षभराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली त्यामुळे दोन्ही पक्षांना फोडून मी पुन्हा आलो असे फडणवीस म्हणाले.